Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन गावठी कट्टे व सहा जिवंत काडतुसे व आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !
    क्राईम

    दोन गावठी कट्टे व सहा जिवंत काडतुसे व आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskJuly 11, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा  : प्रतिनिधी 

    तालुक्यातील हातेड-लासूर रस्त्यावर चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील सराईत गुन्हेगार श्याम नामदेव चव्हाण व समीर शुभान सय्यद यांच्याकडून दोन गावठी कट्टे व सहा जिवंत काडतुसे जप्त केल्याची घटना दि. १० रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.

    चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती. त्याआधारे, हातेड-लासूर रस्त्यावर एका दुचाकीवरून (एमएच १९ / बीवाय ३४१३) मध्य प्रदेशातील पारउमर्टी येथून चाळीसगावला जात असताना श्याम नामदेव चव्हाण उर्फ सॅम (२४), समीर शुभान सय्यद (२३, दोघे हिरापूर, ता. चाळीसगाव) यांच्याकडून पोलिसांनी १ लाख ५ हजार किमतीचे दोन गावठी कट्टे, ३ हजार किमतीचे सहा जिवंत काडतुसे, पन्नास हजार किमतीची दुचाकी असा एकूण १ लाख ५८ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, पोहेकॉ लक्ष्मण शिंगाणे, राकेश पाटील, किरण धनगर, पोना किरण पाटील, पोकों दिलीप पाटील यांनी केली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तरुणाच्या खून प्रकरणातील एकाला अटक ; पारोळा पोलिसांची कारवाई !

    September 12, 2026

    गिरणेच्या वाळूची चोरटी वाहतूक; जळगावात दोन ठिकाणी पोलिसांची धडक कारवाई

    September 12, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

    September 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.