जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारांची गेल्या काही दिवसापासून सातत्याने हिम्मत वाढत चालली असताना दिसून येत आहे जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून नियमित होत असलेल्या घरफोड्या त्यानंतर आज पहाटे दिवसाढवळ्या भर चौकात स्टेट बँकेच्या शाखेत टाकलेला दरोडा हा पोलिसांना आव्हान देणारा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात असलेल्या स्टेट बँक शाखा शाखेत आज सकाळी दहा ते अकरा वाजेच्या सुमारास भर दिवसा शस्त्रास्त्रच्या बळावर दरोडा टाकीत 15 ते 17 लाख रुपये लुटण्याची घटना घडल्याने परिसरासह शहरात खळबळ उडाली आहे.
काय घडली घटना
जळगाव शहरातून भुसावळ कडे जाणाऱ्या जुन्या खेडी रोड परिसरात असलेल्या काशीबाई उखाजी कोल्हे कोल्हे या शाळेजवळ स्टेट बँक ऑफ इंडिया ची शाखा आहे आज सकाळी या शाखेतील कर्मचाऱ्यांनी कार्यालय सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडले असता या ठिकाणी दोन तरुण दुचाकी वर येत बँकेत आले त्यांच्याकडे शस्त्रास्त्र असल्याचे दिसत आहे त्यानंतर त्यांनी या ठिकाणी असलेल्या व्यवस्थापकासह तीन ते चार कर्मचाऱ्यांना धमकावीत त्यांनी व्यवस्थापकाच्या मांडीवर कोयत्याने वार देखील केल्याची वृत्त समोर आले आहे.
घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी एमआयडीसीचे प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.