जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणीचा मोबाईल अनोळखी चोरट्यांनी लांबविल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील पाल येथील २३ वर्षीय शिरीना गबू तडवी हि तरुणी शिक्षणासाठी जळगाव शहरातील जिल्हा पेठ परिसरातील एका ठिकाणी राहायला आहे. दि २९ रोजी ६ वाजेच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी घरातून ७ हजार किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना.प्रदीप पाटील हे करीत आहेत.