• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नफ्याचे आमिष देणाऱ्याला घेतले ताब्यात !

जळगाव सायबर पोलिसांनी केली कारवाई

editor desk by editor desk
May 30, 2023
in क्राईम, जळगाव
0
नफ्याचे आमिष देणाऱ्याला घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी 

एका कंपनीद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल, असे आमिष दाखवून रावेर येथील भूषण हाटे यांना ९ लाख ३० हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घालणाऱ्या सायबर ठगाला सायबर पोलिसांनी गुजरात राज्यातील भावनगर येथून बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याजवळून ५ लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. रावेर तालुक्यातील भूषण हाटे यांना एप्रिल महिन्यात सायबर ठगाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल ९ लाख ३० हजारांची ऑनलाइन फसवणूक केली होती. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

पोलिसांनी भूषण यांचे व्हॉट्सअॅप आणि बँकेतील झालेल्या व्यवहाराच्या मदतीने संशयित आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, तो गुजरात राज्यातील भावनगर येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, प्रवीण वाघ, दिलीप चिंचोले, गौरव पाटील यांच्या पथकाने सायबर ठग विजय ऊर्फ अजय दयाभाई कलसरिया (३३, रा. अम्रेली, भावनगर, गुजरात) याला रविवारी अटक केली. त्याच्याकडून फसवणुकीपैकी ५ लाख रुपये हस्तगत केले आहे.

Previous Post

लग्नासाठी आले पण वरात घेवून फिरले माघारी !

Next Post

संतापजनक : चोपडा तालुक्यात अल्पवयीन मुलगी गरोदर !

Next Post
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !

संतापजनक : चोपडा तालुक्यात अल्पवयीन मुलगी गरोदर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group