प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियानांतर्गत धरणगाव शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत शासनाकडून २७ कोटी ४४ लाख रूपये मंजूर झाल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, गेल्या अनेक वर्षांपासून धरणगाव शहरात पाणी पुरवठा नियमित होत नसल्याची ओरड होती. यासंदर्भात अद्यापपर्यंत निधी मंजूर नसल्यामुळे कामकाज होत नव्हते. दरम्यान, यासंदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला धरणगाव शहरात नवीन व वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव पाठविला. दरम्यान, शासनाने या प्रस्तावाला मंजूरी दिली असून सुमारे २७ कोटी ४४ लाख ६ हजार २७५ रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकर या कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.