जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातून एका घरातील वाल कंपावूडमधून २० हजाराची सायकल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणपती नगर परिसरातील मनीषा कॉलनी येथील रहिवासी ललित सतीशचंद्र मणियार यांच्या मालकीच्या घराच्या कंपावूडमधून दि. २४ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेच्या सुमारास २० हजार रुपये किमतीची सायकल अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी त्यांनी रामानंद नगर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामानंद नगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.रेवानंद साळुखे हे तपास करीत आहेत.