जळगाव : प्रतिनिधी
शहरातील हरिविठ्ठल नगरातील मराठी शाळेजवळून युवराज सुकलाल हिरे यांची दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याला शनिवारी एमआयडीसी पोलिसांनी साईनगरातून ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, युवराज हिरे यांची दुचाकी शनिवार दि. २० मे रोजी चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, ही दुचाकी घेऊन अल्पवयीन चोरटा एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईनगरात फिरवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले. ही कारवाई उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, इम्रान सय्यद, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील आदींनी केली.