Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संकेत सूर्यवंशी उच्च शिक्षणासाठी जर्मनी ला रवाना !
    धरणगाव

    संकेत सूर्यवंशी उच्च शिक्षणासाठी जर्मनी ला रवाना !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 18, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील बालकवी ठोंबरे व सा. दा. कुडे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तसेच तालुका क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी यांचा मुलगा संकेत सूर्यवंशी उच्च शिक्षणासाठी जर्मनी येथे जाणार आहे. ही गोष्ट खऱ्या अर्थाने अभिमानास्पद असल्याने मित्र परिवाराच्या वतीने संकेत चा सत्कार करण्यात आला.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुका क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी यांचा मुलगा संकेत Germany येथील Bavaria राज्यातील Hochschule für Angewandte Wissenschaften Hof या कॉलेजमध्ये ‘Masters In operational Excellence’ या शिक्षणक्रमाचे अध्ययन करण्यासाठी उद्या दि. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी जर्मनी ला रवाना होणार आहे. संकेत लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. BE Mechanical ला (8.6 CGPA First class with distinction) मिळवून आता पुढील उच्च शिक्षणासाठी जर्मनी जात आहे.

    आपल्या गावातील मुलगा शिक्षणक्षेत्रात नावलौकिक मिळवतोय ही गोष्ट अभिमानास्पद आहे. त्याच्या या यशात त्याला आई – वडिलांचे व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याची प्रतिक्रिया संकेत ने दिली. संकेत सूर्यवंशी व वडील सचिन सूर्यवंशी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. याप्रसंगी समस्त पाटील समाज पंच मंडळाचे अध्यक्ष भिमराज पाटील, विकल्प ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष प्रा. रविंद्र मराठे, कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील सर, त्रिमूर्ती इंजिनिअरींग कॉलेज जळगावचे अरविंद शिंदे सर तसेच गुड शेपर्ड स्कुलचे अमोल सोनार सर उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    २२६ नगरपरिषद-३८ नगरपंचायतींसाठी आज मतदान; सकाळपासून मतदारांची गर्दी !

    December 2, 2025

    राणे बंधूंनी भाजपचा खरा चेहरा ओळखून वाद मिटवावा ; रोहित पवारांनी दिला सल्ला !

    December 1, 2025

    निवडणूक तापली : छत्रपतींच्या पुतळ्यावर टोपी घालण्यावरुन वाद !

    December 1, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.