Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुर्दैवी : लग्नाची वरात निघणार होती पण आता अंत्ययात्रा !
    क्राईम

    दुर्दैवी : लग्नाची वरात निघणार होती पण आता अंत्ययात्रा !

    editor deskBy editor deskMay 24, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगावात दहा दिवसांवर मुलाचे लग्न येवून ठेपल्याने नातेवाईकांसह ऑफिसातील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या गस सोसायटीतील प्रशासन अधिकारी महेंद्र रामा मोरे (वय -57, रा. जीवननगर) यांचा एरंडोल येथे कार्यालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे लग्नाच्या घरात शोककळा पसरली आहे. ज्या घरातून येत्या दहा दिवसात लग्नाची वरात निघणार होती त्याच ठिकाणाहून आता वडिलांची दुर्देवी अंत्ययात्रा निघणार आहे.

    शहरातील जीवन नगरात ग. स. सोसायटीचे प्रशासन अधिकारी महेंद्र रामा मोरे (वय 57) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचा मोठा मुलगा विक्रांत याचे दि. 1 जून रोजी विवाह सोळहा होणार आहे. विवाह सोहळा दहा दिवसांवर येवून ठेपल्याने महेंद्र मोरे हे मंगळवारी सकाळी पत्रिका वाटण्यासाठी बाहेर पडले. चोपडा, अमळनेर, धरणगावमार्गे ते एरंडोल येथील ग. स. सोसायटीच्या कार्यालयात पत्रिका वाटण्यास 3 वाजेच्या सुमारास आले होते. खुर्चीवर बसले असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना जवळच्याच रुग्णालयात कर्मचार्‍यांनी नेले असता, वैद्यकीय अधिकार्‍यांनी जळगाव येथे नेण्यास सांगितले. जळगाव शासकीय रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी मयत घोषित केले. त्यांच्या या मृत्यूने परिवारातील सदस्य व मित्र परिवाराला चटका लावून जाणारी घटना घडली आहे.

    मोरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळल्यामुळे त्यांनी नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात एकच आक्रोश केला. रुग्णालयात ग. स. सोसायटीतील कर्मचार्‍यांनी मोरे कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात पत्नी शारदा, मोठा मुलगा विक्रांत, लहान मुलगा कुणाल असा परिवार आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.