Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हिस्सा वाटणीवरुन वृद्धाने रेल्वेखाली संपविले जीवन !
    क्राईम

    हिस्सा वाटणीवरुन वृद्धाने रेल्वेखाली संपविले जीवन !

    editor deskBy editor deskMay 24, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका ५५ वर्षीय इसमाने दि २३ रोजी धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना असोदा रेल्वेगेटजवळ घडली आहे. शेतीच्या हिस्से वाटणीवरुन भावंडांमध्ये वाद सुरु होता. चार भावंडांनी शेतीची वाटणी केली मात्र एकाला मात्र हिस्सा दिला नाही. त्याच कारणावरुन संजय सपकाळे (वय-55, रा. कुवरखेडा ता.जि. जळगाव ह.मु. कासमवाडी जळगाव) यांनी आत्महत्येपुर्वी सपकाळे यांनी आपल्या शालकाला फोन करुन आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांसह नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. यावेळी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कासमवाडीत संजय सपकाळे हे पत्नी व मुलीसोबत रहायला असून ते रिक्षा चालवून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या शेतातील हिस्से वाटणीवरून पाच भावांमध्ये वाद सुरू होता. दरम्यान इतर भावांना शेतातील वाटेहिस्से देण्यात आले होते. परंतु संजय सपकाळे यांना शेतातील कुठलाही हिस्सा देण्यात आलेला नव्हता, त्यामुळे माझा हिस्सा मिळावा या मागणीसाठी अनेक महिन्यांपासून ते भावंडांसोबत वाद सुरु होते. दरम्यान मंगळवारी 23 मे रोजी सकाळी शेतीच्या हिस्से वाटेवरून वाद झाला. त्यावेळी भाऊ यांनी शेती देण्यास नकार केला, या संतापाच्या भरात संजय सपकाळे यांनी शालक गजानन आधार सोनवणे यांना फोन करून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगून आसोदा रेल्वे फाट्याजवळ रिक्षा बाजूला लावून धावत्या रेल्वेखाली उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रघुनाथ महाजन यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. दरम्यान आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मयत संजय सपकाळे यांची पत्नी कल्पना व मुलगी खुशी यांनी केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.