Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुकानदराने उधार न दिल्याने मारहाण !
    क्राईम

    दुकानदराने उधार न दिल्याने मारहाण !

    editor deskBy editor deskMay 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या सुप्रीम कॉलनीत पानटपरीमधून सामान उधार देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पानटपरी चालकास बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    उमेश ऊर्फ भावड्या संतोष राजपूत (वय २२, सुप्रीम कॉलनी) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पानटपरी चालवून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास टपरी बंद करून उमेश हा घरी जात होता. पानटपरीतील सामान उधारीने देत नसल्याच्या कारणावरून शारदा शाळेच्या प्रांगणाजवळ किरण चितळे (वय १९) विजय, बेंडा बाप्या, आकाश, पप्पू माचिस, रोहित (पूर्ण नाव समजू शकले नाही.) (सर्व रा. सुप्रीम कॉलनी) यांनी शिवीगाळ करून उमेश राजपूत याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. जिवे मारण्याची धमकीही दिली. यातील काहींनी उमेशच्या दुचाकीला दगड मारून नुकसान केले. हा प्रकार घडल्यानंतर उमेश राजपूत याने रविवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.