जळगाव : प्रतिनिधी
भरधाव रेल्वेगाडीचा धक्का लागल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव-आसोदा रेल्वे अपलाईन रेल्वेलाईनजवळ सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील आसोदा रेल्वेच्या डाऊन लाईनवर धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका 55 वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृत्यू झाला. रेल्वे कर्मचारी तथा ट्रॅकमॅन उमेश भारंबे यांनी यासंदर्भात जळगाव रेल्वे स्टेशनचे उपप्रबंधक यांना घटनेची माहिती दिल्यानंतर सोमवारी सकाळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सहाय्यक फौजदार अनिस सपकाळे आणि हवालदार मराठे यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करीत तो शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अनोळखीचे ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.