जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील शिरसोली गावातील १७ वर्षीय तरुणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्देवी घटना घडली आहे. घरात एकटी असताना शिरसोलीतील पूजा सुधाकर वंडोळे (बारी) या १७ वर्षीय युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.
आई बाहेर गेली असताना पूजा घरात एकटीच होती. तिने घराचा कडीकोयंडा लावला आणि गळफास घेतला. आई घरी आल्यावर दरवाजा उघडत नाही, म्हणून आरडाओरड सुरू केली. तेव्हा शेजारच्या मंडळींनी धाव घेतली आणि दरवाजा उघडला. तेव्हा पूजा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. पूजाला दुपारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी मृत घोषित केले. मयत पूजा हिच्या पश्चात आई, भाऊ व आजी असा परिवार आहे. यासंदर्भात एमआयडीसी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.