Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सम्राट कॉलनीत पुन्हा दगडफेक !
    क्राईम

    सम्राट कॉलनीत पुन्हा दगडफेक !

    editor deskBy editor deskMay 20, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील महामार्गानजीक असलेल्या सम्राट कॉलनी परिसरात एका धार्मिक स्थळावर दगडफेक केल्याची घटना दि १९ रोजी शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता घडली होती. त्यामुळे परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. एमआयडीसी पोलिसांनी घटनांसाठी तत्काळ दाखल होऊन तणाव नियंत्रणात आणले दरम्यान रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण शांतता होती. पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली.

    मिळालेल्या माहितीनुसार, सम्राट कॉलनी परिसरात बुधवारी रात्री वाढदिवसाच्या केक कापण्याच्या कारणावरून काही तरुणांनी दगडफेक करून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच महामार्गाजवळील आज पुन्हा सम्राट कॉलनी परिसरातील एका धार्मिक स्थळावर शुक्रवारी १९ मे रोजी रात्री ९ वाजता काही तरुणांकडून दगडफेक केल्याची घटना घडली.
    या घटनेमुळे जळगाव शहर शहरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे साहेब फौजदार अतुल वंजारी पोलीस नाही इमरान सय्यद यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाल्यानंतर जमावाला पांगवापंगाव केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. सलग एकदिवसानंतर पुन्हा त्याच परिसरात काही टवाळखोरांनी दगडफेक केल्यामुळे परिसरात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेऊन टवाळखोरांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.