जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेले असतानाही सुप्रीम कॉलनीमध्ये सुरा फिरणाऱ्या घेऊन गुन्हेगाराला बुधवारी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास पकडले. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनूसिंग रमेश राठोड (२३, रा. सुप्रीम कॉलनी) असे अटक झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. सोनूसिंग राठोड याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मात्र, तो हद्दपार असतानाही सुप्रीम कॉलनीमध्ये फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. बुधवारी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्याला पकडून अंगझडती घेतली.
त्यावेळी त्याच्याजवळ लोखंडी सुरा मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक करीत सुरा जप्त केला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, छगन तायडे, साईनाथ मुंडे, आदींच्या पथकाने केली आहे. राठोड याच्यावर पूर्वी १३ गुन्हे दाखल आहेत



