Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात ४ लाखांची घरफोडी !
    क्राईम

    जळगावात ४ लाखांची घरफोडी !

    editor deskBy editor deskMay 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरातील एका परिसरात चोरट्यांनी बंद घराचे दरवाज्याचे कुलूप तोडून तब्बल ४ लाखांच्या दागिन्यासह रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पार्वती नगरातील अभिराम अपार्टमेंट मधील रहिवासी स्नेहल सौरभ फडके(वय ३८) हे दि.१४ रोजी आपल्या घराच्या दरवाज्याला कुलूप लावून बाहेर गावी गेले असता. दि १४ ते १७ रोजी दरम्यान अनोळखी चोरट्यांनी या बंद घराचे कुलूप तोडून घरातील ८० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार, ६५ हजार किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, ८० हजार रुपये किमतीच्या २ सोन्याच्या चैन, ३५ हजार किमतीच्या ३ जोड सोन्याचे कानातले, १ लाख रुपये किमतीचे २ किलो वजनाचे चांदीचे ताट, समई, निरंजन, शिक्के यासह २५ हजार रुपयांचा कॅमेरा, १५ हजारांची रोकड असा एकूण ४ लाख रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या प्रकरणी महिलेने रामानंद नगर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी घटनास्थळी भेटून देवून पाहणी केली आहे. तर पुढील तपास सपोनि. रोहीदास गभाले हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.