धरणगाव : प्रतिनिधी
पिंपळे फाटा ते शगुन जिनिंगदरम्यान दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी वासुदेव हिलाल चित्ते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथील इस्त्रीचे काम करणारे महेंद्र हिलाल चित्ते (४०) हे मोटारसायकलने (एमएच १९ एडब्ल्यू ४६९७) चोपडा येथून येत असताना त्यांच्या दुचाकीला पवन कैलास कोळी याच्या दुचाकीने (एमएच १९ डीट १९५८९) धडक दिली. त्यात महेंद्र चित्ते यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातात पवन कोळी हाही जखमी झाला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल सय्यद करीम अमजद करीत आहेत.