जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील एका परिसरातून सोन्याच्या दागिन्यासह रोकड असा एकूण ३३ हजाराची घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खोटे नगर परिसरातील हिराशिवा कॉलनी परिसरातील हनुमान मंदिराजवळील रहिवासी नम्रता गादिया(वय ५०)या दि १३ रोजी आपल्या मैत्रिणीच्या घरी जेवणासाठी गेले असतांना घर बंद असल्याचा फायदा घेत अनोळखी चोरट्यांनी दि.१३ मे रोजी भर दुपारच्या सुमारास बंद घरचा दरवाजा कडीकोयंडा तोडून घरातील लोखंडी कपाटातून २० हजाराचे सोन्याची चैन, ३६०० रुपयांचे चांदीचे शिक्के सोबत १० हजाराची रोकड लंपास केली आहे. महिला घरी आले असता त्यांना घर उघडे दिसल्याने त्यांनी घरात पाहणी केली असता त्यांना चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच जळगाव तालुका पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.अनिल फेगडे हे करीत आहेत.