अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर शहरातील तांबेपुरा परिसरातील रूपाली गजेंद्रसिंग राजपूत (३३) या विवाहितेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना रोजी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती येथून विवाह सोहळा आटोपून गुरुवारी सायंकाळी रेल्वेनेरुपाली या शहरात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना मळमळ व उलट्या होत असल्याने तांबेपुरा परिसरातील एका खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. उष्माघाताची लक्षणे असल्याने संबंधित डॉक्टरांनी औषधोपचार केले. नंतर त्यांना रात्रभर बरेही वाटले. मात्र सकाळी पुन्हा तोच त्रास सुरू झाल्यावर पतीने गावातील अन्य खासगी डॉक्टरांकडे नेले असता त्यांनी तपासणी करून रूपाली यांना मृत घोषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताडे यांनी शवविच्छेदन केले. त्यांचा मृत्यू उष्माघातानेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दीपक राजपूत यांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. रूपाली यांच्या पश्चात पती, सासू, सासरे, दीर असा परिवार आहे.