Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणीला मारहाण करून दागिन्यांची पर्स लांबविणाऱ्याना घेतले ताब्यात !
    क्राईम

    तरुणीला मारहाण करून दागिन्यांची पर्स लांबविणाऱ्याना घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskMay 12, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील तांबापुरा परीसरातील गौतमनगरात जुन्या वादातून आरोपींनी एका दाम्पत्यास मारहाण करीत त्यांच्याकडील रोकड तसेच दागिणे असलेली 33 हजारांचा ऐवज असलेली पर्स लांबवल्याने एमआयडीसी पोलिसात यात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दोघा आरोपी पती-पत्नीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. संजना फरहान शेख व फरहान शब्बीर शेख असे अटकेतील दाम्पत्याची नावे आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापुर परिसरातील गौतम नगराताील तबस्सुम आरा इक्बाल खान (21) यांच्या तक्रारीनुसार, त्या एका रुग्णालयात अकाउंटंट असून 9 रोजी रात्री साडेआठ वाजता घराकडे येत असताना संशयित संजना फरहान शेख व तिचा पती फरहान शब्बीर शेख (दोन्ही रा.तांबापुरा) यांनी अडवत तुझी आईला समजावून सांग, ती आमच्याविरोधात तक्रार का देते? असे सांगितल्याने त्यांना तक्रारदार समजावत असताना संजना हिने तबस्सुम हिच्या डाव्या हाताच्या दंडाला चावा घेत दुखापत केली तर यावेळी तबस्सुम यांचा भाऊ अमजद आल्यानंतर त्यास फरहाने याने मारहाण करीत दोघा आरोपींनी तक्रारदाची पर्स लांबवली. या पर्समध्ये दोन हजार 700 रुपयांची रोकड व चांदीची अंगठी असा तीन हजार तीनशे रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी तबस्सुम खान यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयित संजना शेख व फरहान शेख यांना अक करण्यात आली व गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली महाजन, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इमरान सय्यद, इमरान बेग यांच्या पथकाने ही कारवाई केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.