जळगाव : प्रतिनिधी
शिष्यवृत्ती परीक्षेत नापास करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तुषार शांताराम माळी (३३, रा. नशिराबाद परिसर) या खासगी क्लासच्या शिक्षकास जिल्हा न्यायालयाने गुरुवारी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या प्रकरणामध्ये पीडित मुलीला बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण नियम २०१२ मधील कायदा ७ नुसार महाराष्ट्र शासनाकडून १० लाख रुपये रक्कम पुनर्वसनासाठी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच आरोपीला २ लाख २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यातील ५० टक्के रक्कम पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने केले आहे.