जळगाव : प्रतिनिधी
आव्हाने गावातून चोरटी वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर कोतवाल यांनी पकडले असता त्यांच्या हातावर तुरी देत चालकाने वाहन पळवून नेल्या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात दोन जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरापासून जवळ असलेल्या आव्हाने परिसरातील गिरणा नदीपात्रातून चोरटी वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर दि ९ रोजी १२.३० वाजेच्या सुमारास आव्हाने शिवारातील स्मशानभूमी जवळ आले असता कोतवाल किशोर चौधरी यांनी वाहतूक करणाऱ्यास थांबविले असता. त्याने ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाल किशोर चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर मालकासह एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.