जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील रिंगरोड परिसरातून एका १७ वर्षीय मुलीला एकाने भरदुपारच्या सुमारास पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रिंगरोड परिसरात दि ६ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास एका १७ वर्षीय मुलगी रस्त्याने जात असतांना मयूर नामक तरुणाने तिला पळवून नेल्या प्रकरणी मुलीच्या भावाने जिल्हा पेठ पोलिसात धाव घेत तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि.किशोर पवार हे करीत आहेत.