दारुच्या नशेत आलेले देाघ एकमेकांना शिवीगाळ करीत असल्याने शेजारी राहणार्यांना विवाहितेने अशा लोकांना याठिकाणी थांबु देत नका जाऊ असे बोलल्याचा राग आल्याने विवाहितेच्या डोक्यात लाकडी दांडुका टाकून तिला गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास हरिविठ्ठल नगरात घडली.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरात ममता नागेश मेढे (वय २४) या परिवारासह वास्तव्यास आहे. शनिवारी सकाळी काही लोक त्यांच्या शेजारच्यांकडे आले होते. त्यांनी मेढे यांच्या घरासमोर दुचाकी उभ्या केल्या होत्या. दरम्यान, ते दारूच्या नशेत एकमेकांना शिवीगाळ करीत होते. त्यामुळे त्यांनी शेजारच्यांना सांगितले की, अशा लोकांना थांबू देत नका जाऊ. मात्र, याचा राग येऊन शेजारच्यांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.