जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात असलेल्या मंदिराचा लाईट सुरु न झाल्याच्या शुल्लक कारणावरून एकाने लोखंडी पट्टीने डोक्यावर वार करून दुखापत केल्याची घटना घडली असून या याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील निमखेडी रोड परिसरातील हर्षवर्धन कॉलनीत वास्तव्यास असलेले दिलीप रामदास शिंपी (वय ६६) हे मजुरी करीत आपला उदरनिर्वाह करतात. दि २ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी लक्ष्मण बंडू मराठे रा.हर्षवर्धन कॉलनी याने फिर्यादी दिलीप शिंपी यांना मंदिराचा लाईट सुरु न झाल्याने मंदिराची अशी कशी इलेकट्रीक फिटिंग केली असा जाब विचारून फिर्यादीला मंदिर आवारात पडलेल्या लोखंडी पट्टीने डोक्यात डाव्या बाजूला मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आरोपी लक्ष्मण मराठे याच्याविरुद्ध तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास गुलाब नामदेव माळी करीत आहे.