जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शनिपेठ परिसरातून एका १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्याक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , जळगाव शहरात एका परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने ४ मे रोजी सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजे दरम्यान कुणीतरी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहे.