यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय महिलेच्या घरात घुसत एकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात ३० वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि २ मे रोजी दुपारच्या सुमारास संशयित आरोपी शेख आरिफ शेख जाबीर हा महिलेच्या घरात कुणीही नसताना व महिला झोपलेली असतांना घरात घुसून तुने अगर चील्लाया या किसको बुलाया तो मै सबको बोल दुंगा कि, तेरा और मेरा लफडा है, असे म्हणत महिलेसोबत अश्लील कृत्य केले या प्रकरणी लागलीच महिलेने फैजपूर पोलीसात धाव घेत संशयित आरोपी शेख आरिफ शेख जलील याच्या विरोधात गुन्हा दाखल करीत पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे हे करीत आहेत.