जळगाव : प्रतिनिधी
शहरातील नवीन बस स्थानक परिसरातील एका ३५ वर्षीय महिलेच्या ६९ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नवीन बस स्थानक परिसरातील एस.टी.वर्क शॉपच्या गेटजवळ दि २ मे रोजी दुपारच्या सुमारास किनगाव येथील सुनिता मधुकर ठाकूर (वय ३५) यांच्या जवळील सोन्याची मंगलपोत व लक्ष्मीहार असा एकूण ६९ हजाराचे दागिने अनोळखी चोरट्याने चोरून नेले आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.महेद्र पाटील हे करीत आहेत.