जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असताना देखील तलवार घेऊन शहरातील समतानगरमध्ये दहशत माजविणाऱ्या राहुल काकडे (रा. समतानगर) याला रामानंदनगर पोलिसांनी रविवारी सायंकाळी ७:५० वाजता बेड्या ठोकल्या असून त्यांच्याजवळून तलवार जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जळगाव जिल्ह्यातून उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये दोन वर्षासाठी हद्दपार असलेला राहुल काकडे हा रविवारी सायंकाळी समतानगरमध्ये तलवार घेऊन दहशत माजवित होता. ही माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळताच, त्यांनी त्याला अटक केली. त्याच्याजवळून तलवार जप्त करून पोलिसात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोपाल देशमुख, संजय सपकाळे, सुशील चौधरी, रेवानंद साळुंखे, रवींद्र चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, अतुल चौधरी, उमेश पवार, अनिल सोननी, दीपक वंजारी आदींनी केली आहे.