Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आई दिसली दुसऱ्याच्या घरात व्यक्तीसोबत मुलाच्या मारहाणीत आईचा मृत्यू !
    क्राईम

    आई दिसली दुसऱ्याच्या घरात व्यक्तीसोबत मुलाच्या मारहाणीत आईचा मृत्यू !

    editor deskBy editor deskApril 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका गावातील घरामध्ये काही व्यक्तींसोबत आई दिसल्यानंतर संतापलेल्या मुलाने आईला लोखंडी सळईने हातासह कमरेवर आणि पोटावर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवार, दि. २४ एप्रिल रोजी रात्री १०:३० वाजता तालुक्यातील एका गावामध्ये घडली होती. दरम्यान, जखमी महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना अखेर तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तालुक्यातील एका गावात मयत महिला ही दोन मुलांसह वास्तव्यास होती सोमवारी रात्री १० वाजता महिलेची दोन्ही मुलं गावातील एका लग्नात नाचत होती. त्यावेळी त्यांना त्यांची आई एका घराकडे जाताना दिसून आली. ही बाब त्यांनी लागलीच शेजारीच राहत असलेल्या मामाला सांगितली. नंतर तिघेही त्या घराकडे गेले. त्यांनी दरवाजा ठोठावला; पण आतून कुणीही दरवाजा उघडत नव्हता. अखेर मुलाने जोरात धक्का देऊन दरवाजा उघडला. तेव्हा त्यांची आई ही काही व्यक्तींसोबत दिसून आली. याचा राग येऊन मुलाने बाजूलाच ठेवलेली सळई उचलून आईला मारहाण केली. यात त्या जखमी झाल्या. त्यांना लागलीच रुग्णवाहिका बोलवून जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना शुक्रवारी पहाटे प्राणज्योत मालवली. अखेर महिलेच्या भावाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून मयताच्या मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.