Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » या अभिनेत्रीच्या मृत्यूने जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का !
    राष्ट्रीय

    या अभिनेत्रीच्या मृत्यूने जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का !

    editor deskBy editor deskApril 28, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियन सारखी दिसणारी मॉडेल क्रिस्टीना एश्टनचे वयाच्या केवळ ३४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. प्लास्टिक सर्जरीनंतर हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समजत आहे.

    हॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्री म्हणून किम कार्दशियनला ओळखले जाते. संपूर्ण जगात तिचे कोट्यवधी फॅन्स आहेत. अनेक मुलींना तर तिच्यासारखे दिसण्याची देखील इच्छा असते. अशीच इच्छा होती मॉडेल क्रिस्टीना एश्टनची. तिची ही इच्छा खूपच मोठी होती आणि म्हणूनच तिने प्लस्टिक सर्जरीचा आधार घेतला. प्लस्टिक सर्जरीनंतर क्रिस्टीना किम कार्दशियनसारखी दिसत होती, मात्र पूर्ण किम नव्हती. यासाठी तिने जगभर फिरुन अनेक प्लास्टिक सर्जरी करुन घेतल्या होत्या. या अनेक सर्जरी केल्यानंतर ती हुबेहुब किम कार्दशियनसारखी दिसू लागली होती. किमची डुप्लिकेट म्हणून तिची ओळख झाली आणि तिच्या फॅन फॉलोविंगमध्येही वाढ झाली होती. क्रिस्टीनाचे सोशल मीडियावर तब्बल सहा लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स होते.

    मॉडेल क्रिस्टीना एश्टनने किम कार्दशियन सारखे दिसणायसाठी केलेल्या सर्जरींवर तब्बल ११.१२ कोटी रुपये खर्च केले होते. यात तिची कॉस्मॅटिक सर्जरी केली गेली होती. एवढ्या सर्जरी केल्यानंतर क्रिस्टीनाला अनेक मेडिकल समस्या देखील जाणवू लागल्या होत्या.
    क्रिस्टीना एश्टनच्या निधनाची बातमी तिच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांना दिली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “२० एप्रिल रोजी पहाटे ४.३० च्या सुमारास आमच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा फोन आला. क्रिस्टीना मरत आहे.असे तो फोनवर सांगत होता. तिच्या निधनाने आमच्या कुटुंबावर मोठी शोककळा पसरली असून, आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.” दरम्यान नुकतेच प्लस्टिक सर्जरीमुळे कॅनेडियन अभिनेता सेंड वॉनचे देखील निधन झाले. त्याने BTS सिंगर जिमिन सारखे दिसण्यासाठी तब्बल १२ सर्जरी केल्या होत्या. क्रिस्टीनाच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यातील शाळांमध्ये सुरक्षितता व सुविधा वाढणार; मंत्री भुसेंची घोषणा

    March 18, 2026

    ज्योतिषी प्रकरणात घोटाळा; सुषमा अंधारे महिला आयोगावर बोली!

    March 18, 2026

    विमान अपघाताची खरी माहिती उघड होणार? रोहित पवारांचा सरकारला मोठा इशारा !

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.