जळगाव : प्रतिनिधी
शहरातील नवीन बस स्थानकावरून बाहेरगावी जाण्यासाठी बसमध्ये चढत असतांना दोन महिलांचे सोन्याच्या दागिन्यासह रोकड लंपास झाल्याची घटना एकाच दिवसात दोन घटना घडल्या आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारने महिलांना बसच्या प्रवासाचे भाडे कमी जरी केले असले तरी बसमधून जाणाऱ्या महिलांची जर अशी लुट होत असेल तर ते भाडे कमी करून महिलांना कसा फायदा मिळणार ?
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नवीन बस स्थानक परिसरात अनेक महिला बसने प्रवास करीत असतात दि २४ एप्रिल रोजी देखील सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास धुळे जिल्ह्यातील राणमाळा येथील कविता जीभाऊ पाटील (वय३५) या आपल्या माहेरी राणीचे बामरूड जाण्यासाठी पाचोरा बसमध्ये चढत असतांना अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या पाकिटातील सोन्याचे दागिने व रोकड एकूण ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास मपोना.पल्लवी मोरे हे करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत जालना येथील राहिवसी लीलादेवी जयप्रकाश रुणवाल(वय ७१) हे जळगाव येथील नवीन बसस्थानकावरून जालना जाण्यासाठी यावल – लातूर या बसमध्ये चढत असतांना त्यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची सोन्याची पोत अनोळखी चोरट्यांनी लांबविली आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात महिलेने धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मपोना.भरती देशमुख हे करीत आहेत.