Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सावधान : कोरोनाच्या रुग्णात दिवसभरात झाली मोठी वाढ !
    आरोग्य

    सावधान : कोरोनाच्या रुग्णात दिवसभरात झाली मोठी वाढ !

    editor deskBy editor deskApril 23, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशात कोरोना रुग्णवाढ सुरूच असून गेल्या 24 तासांत तब्बल 12 हजार 193 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, तर तब्बल 42 जणांचा कोरानामुळे मृत्यू झाला आहे. तर एकाच दिवसात 10 हजार 765 जणांनी कोरोनावर मात केली असली तरी नव्या रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांची संख्या 67 हजार 556 वर पोहोचली आहे.

    देशात दोन दिवस रुग्णसंख्या वाढल्यानंतर गुरुवारी कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते, मात्र शुक्रवारपासून पुन्हा एकदा रुग्णवाढ सुरू झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 19 एप्रिल रोजी सर्वाधिक 12 हजार 591 रुग्ण आढळून आले होते. त्याआधी सलग चार दिवस रुग्णांमध्ये घट झाली होती. 14 एप्रिलला 10 हजार 753, 15 एप्रिलला 10 हजार 93, 16 एप्रिलला 9 हजार 111 आणि 17 एप्रिलला 7 हजार 633 रुग्ण आढळून आले होते. त्याच वेळी, 18 एप्रिल रोजी 10,542 कोरोना रुग्ण आढळले. 19 एप्रिल रोजी कोरोनाच्या रुग्णांमध्ये दोन हजारांची वाढ झाली होती. तर आता पुन्हा रुग्ण वाढत आहेत. दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 11,97,477 चाचण्यांमध्ये 12,193 रुग्ण आढळले.

    – मुंबईत गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 1685 चाचण्यांमध्ये 177 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, तर कोरोनामुळे दोघांना जीव गमवावा लागला आहे. नव्या बाधितांमधील 20 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील सहा जणांना ऑक्सिजनची गरज लागली. तर एकाच दिवसात 264 जणांनी कोरोनावर मात केली. मात्र नव्या रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांची संख्या 1377 झाली. राज्यात गेल्या 24 तासांत 850 कोरोनाबाधित आढळले असून चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर 648 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र नव्या रुग्णांमुळे कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 6167 झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत राजकीय रणसंग्राम

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.