जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या सुप्रीम कॉलनीतील बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण १ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी ५ वाजता उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सुप्रीम कॉलनीतील रहिवासी मोहम्मद अवेस अब्दुल सत्तार हे आई, बहीण व भाच्यासह भाड्याच्या घरामध्ये राहतो. घरासमोर राहणारी आजी मुमताजबी यांचे सुरत येथे निधन झाल्यामुळे रात्री मोहम्मद हा घराला कुलूप लावून कुटुंबीयांसह मामा रऊफ खान लुकमान खान यांच्याकडे गेला होता. दरम्यान, दुपारी घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली असून, चोरट्यांचा सुगावा मिळेल, असेही काहीही हाती लागलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.