Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हृदयद्रावक : भरधाव रेल्वेत महिलेला पेटविले ; ८ प्रवासी जखमी !
    क्राईम

    हृदयद्रावक : भरधाव रेल्वेत महिलेला पेटविले ; ८ प्रवासी जखमी !

    editor deskBy editor deskApril 3, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    एका रेल्वेमध्ये प्रवास करीत असलेल्या दोन महिलेसोबत वाद झाल्यानंतर त्यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची हृदयद्रावक घटना केरळच्या कोझिकोडमध्ये घडली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना केरळच्या कोझिकोड अलप्पुझा-कन्नूर मेन एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसच्या D1 डब्यात रात्री 10 वाजता घडली. या घटनेत आठ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमी झालेल्या पाच जणांना कोझिकोड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, इतर तीन जखमी लोकांना कोझिकोडच्या बेबी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

    Kerala | An unidentified man poured petrol on a passenger & set fire inside a moving train near Elathoor in Kozhikode district. 8 people were admitted to a hospital. The incident took place in the D1 compartment of Alappuzha-Kannur Main Executive Express around 10 pm. Further…

    — ANI (@ANI) April 2, 2023

    दरम्यान, ही घटना इलाथूर पुलावर ट्रेन असताना घडली. अलप्पुझाहून कन्नूरला जाणारी एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेस कोझिकोड सेंट्रल स्टेशनवरून निघाली होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसच्या D1 डब्यात ही हृदयद्रावक घटना घडली. काही वादानंतर आरोपीने महिलेवर पेट्रोल शिंपडल्याचे ट्रेनमधील प्रवाशांनी सांगितले. ट्रेनमध्ये असलेल्या लोकांनी महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आठ जण जखमी झाले तर बाकीचे इतर डब्यात पळून गेले. तर आरोपीने ट्रेनमधून उडी मारून पलायन केले. आरपीएफ आणि कोझिकोड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.