Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुलीचा आवाज काढून दोन भाऊ करायचे असे कृत्य !
    क्राईम

    मुलीचा आवाज काढून दोन भाऊ करायचे असे कृत्य !

    editor deskBy editor deskApril 1, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    नोएडाच्या सेक्टर-58 मधील पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी दोन भावांना अटक केली आहे. दोन्ही भाऊ मुलींचे आवाज काढून लोकांना फसवत होते. पोलिसांनी गुन्हेगारांना मुलीचा आवाज काढण्यास सांगितला, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
    पोलिसांनी दोन भाऊ केतन अरोरा आणि चिराग अरोरा यांना अटक केली होती. दोन्ही भाऊ बेरोजगार तरूणांना जिगोलोची नोकरी देण्याच्या नावावर फसवत होते. पोलिसांनी सांगितलं की, व्हायरल व्हिडीओ हा एक सायबर फसवणुकीचा आहे. हे तरूण मुलींचा आवाज काढून लोकांची फसवणूक करत होते.

    पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गेल्या 5 मार्चला एका पीडितने तक्रार दाखल केली होती की, त्याला एक स्पा सेंटर उघडण्याच्या नावावरून एक लाख 83 हजार रूपयांनी फसवण्यात आलं. चौकशी दरम्यान समोर आलं की, दोन भाऊ केतन अरोरा आणि चिराग अरोरा फेसबुक आणि इन्स्टासारख्या सोशल मीडिया साइट्सवर फेस पेज तयार करत होते. ज्याद्वारे ते लोकांकडून तरूणी बनून नंबर घेत होते आणि फोनवर मुलीच्या आवाजात बोलत होते. ते तरूणांना जिगोलोची नोकरी देण्याचं सांगत होते. मुलींचा आवाज ऐकून लोक त्यांच्या जाळ्यात अडकायचे आणि त्यांच्याकडून पैसे घेत होते.

    पोलिसांनी सांगितलं की, दोन भाऊ मिळून लोकांना फसवत होते. हे दोघेही दोन वर्षापासून अॅक्टिव होते. दोघेही राज नगर एक्सटेंशन येथील आपल्या घरातूनच सगळं काम करत होते. आरोपींनी चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितलं की, त्यांच्यासोबतही अशी घटना झाली होती. पोलिसांनी त्यांची पाचही बॅंक खाती सीझ केली आहेत. त्यांनी किती लोकांना आणि किती रूपयाने फसवलं याची चौकशी सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.