Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ४ वर्ष शिक्षकाने केले विद्यार्थीनीला प्रपोज नंतर घडले ते भयावहक !
    क्राईम

    ४ वर्ष शिक्षकाने केले विद्यार्थीनीला प्रपोज नंतर घडले ते भयावहक !

    editor deskBy editor deskMarch 29, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    आतापर्यंत एकतर्फी प्रेमाची अनेक प्रकरणं आपण पाहिली आहेत, यामध्ये प्रेमवेडे आशिक टोकाचा निर्णय घेत ज्या मुलीसोबत आयुष्य घालवण्याची स्वप्न पाहिलीच तिच्यासोबतच त्यांनी घात केला आहे. अशातच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये एक ट्यूशन टीचरच विद्यार्थीनीच्या प्रेमात पडला होता. सलग 4 वर्षे शिक्षक संबंधित विद्यार्थिनीला प्रपोज करत होता मात्र तिने कायम नकार दिला. शेवटी त्याने जे केलं त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

    आरोपी शिक्षक विद्यार्थीनीला शिकवायचा. काही दिवसानंतर त्याचं शिकवता शिकवता माझंविद्यार्थीनीवर एकतर्फी प्रेम होतं. त्याने अनेकदा तिच्यासमोर प्रेम व्यक्त केलं होतं. परंतु प्रत्येक वेळी तिने त्याला नकार दिला. सारखा सारखा तिचा नकार ऐकून तो रागावतो. त्यानंतर त्याने 4 जणांच्या मदतीने तरूणीला जबरदस्ती कारमधून घेऊन गेला. त्यानंतर त्यानं तरूणीची गळा दाबून हत्या केली. दीपक गुप्ता असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे.ही घटना झारखंड येथील कोडरमा जिल्हातील आहे. हत्येनंतर पोलीस 6 दिवस तरूणीचा शोध घेत होते. मग संशयाच्या आधारावर पोलिसांनी सनकी आशिकला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने स्वतःचा गुन्हा कबूल केला. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपीसह त्याच्यासोबत सामिल झालेल्या अन्य 4 जणांना अटक केली आहे.

    या प्रकरणातील पीडित 6 दिवसांपूर्वीच म्हणजेच 21 मार्च रोजी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या दरम्यान पीडित तरूणीला काही युवकांनी टाटा सूमो कारमधून नेल्याचं काही लोकांनी पाहिलं होतं. त्या प्रत्यक्षदर्शी लोकांनी ती माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारावर एकतर्फी आशिक दीपक गुप्ता आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतलं आहे.

    आरोपी दीपक गुप्ताची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपला गुन्हा मान्य केला. त्यानं सांगितलं की, माझ्या 4 साथीदारांनी (संजय मेहता, संतोष मेहता, रोहित मेहता आणि भरत उर्फ ​​कारू) सोनीचे अपहरण केले. त्यावेळी रोहित मेहता टाटा सुमो गाडी चालवत होता. त्यानंतर सोनीला एका निर्जनस्थळी नेऊन तिचा गळा आवळून खून करण्यात आला. तसंच पुरावा नष्ट करण्यासाठी आम्ही तिचा मृतदेह पोत्यात भरून एका खड्डयात पुरला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.