प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये आज इयत्ता ८ वी ते १० वी चे वर्ग सुरू झाले. शाळेच्या पहिल्या दिवशी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व विद्यार्थ्यांचे स्वागत करून पहिल्या दिवसाची उत्साहात सुरवात झाली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासन निर्देशांचे पालन करून शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या. यानुसार आज गुड शेपर्ड स्कुल धरणगाव येथे शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात उत्साहात झाली. सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे पूर्व प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करण्यात आली. आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून उपशिक्षक सागर गायकवाड यांनी महात्मा गांधी व शास्त्रीजींच्या कार्याची माहीती वर्णन केली.
या राष्ट्रपुरुषांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला तर आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो असा आशावाद गायकवाड सरांनी व्यक्त केला. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे शाळेच्या प्राचार्या, शाखा व्यवस्थापक व शिक्षक वर्गाचे देखील गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता ८ वी ते १० वी च्या वर्गातील जवळजवळ ७० टक्के विद्यार्थांची उपस्थिती पहावयास मिळाली. कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, माध्यमिक च्या मुख्याध्यापिका नाजनिन शेख, शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, पूनम कासार, शिक्षक लक्ष्मण पाटील, सागर गायकवाड तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल देशमुख हे शिक्षकेतर कर्मचारी आणि इयत्ता ८ वी ते १० वीचे विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन लक्ष्मण पाटील यांनी व्यक्त केले.