जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील एका परिसरातील २२ वर्षीय तरूण जळगाव जिल्ह्यातून हद्दपार असतांना देखील हातात तलवार घेऊन दहशत सुप्रिम कॉलनीतील रामदेवबाबा मंदिराजवळ माजविणाऱ्या दिनकर ऊर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (वय २२, रा. सुप्रिम कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास बेड्या ठोकल्या. त्याच्यावर कारवाई करून तलवार जप्त करण्यात आली आहे. दिनकर चव्हाण याला जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. मात्र, तरीही तो सुप्रिम कॉलनीतील रामदेवबाबा मंदिराजवळ तलवार घेऊन फिरत होता.
यांनी केली कारवाई !
एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या माहितीच्या आधारे पोलिस उप निरीक्षक आनंदसिंग पाटील, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोलिस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, पो. कॉ. किरण पाटील, नाना तायडे आदींना पुढील तपास आणि कारवाईकामी रवाना केले. तपास व शोध पथकाने दिनकर चव्हाण यास तलवारीसह ताब्यात घेत अटक केली आहे.