Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » २९ हजार ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालक १ मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनावर धडकणार !
    अमळनेर

    २९ हजार ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालक १ मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनावर धडकणार !

    editor deskBy editor deskMarch 1, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागा अंतर्गत “आपले सरकार” प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक कार्यरत असून ११ वर्ष प्रामाणिक काम केलेल्या संगणक परिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना करत असुन याच मागणीसाठी राज्य संघटनेच्या वतीने २७ फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व संगणक परिचालक कामबंद ठेऊन बेमुदत संप करणार असून १ मार्च २०२३ रोजी अर्थ संकल्पीय अधिवेशनात मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली आहे. त्यासंबंधीचे निवेदन अमळनेर तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांना दिले असून आजपासून त्यांचे कामबंद आंदोलन सुरू होणार असून सुधारित आकृतिबंधात घेण्याच्या मागणीसाठी अमळनेर तालुक्यातील सर्व संगणक परिचालक आज मुंबईसाठी रवाना होणार आहेत.

    याबाबत सविस्तर वृत्त की, संग्राम व आपले सरकार या दोन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर राज्यातील संगणकपरिचालक प्रामाणिकपणे काम करत आहेत. परंतु शासनाने संगणक परिचालकाना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्याच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.आपले सरकार प्रकल्पात काम करणार्याि संगणक परिचालकांवर नेहमी अन्याय करण्यात आलेला असून ग्रामविकास विभागाने १४ जानेवारी २०२१ रोजीच्या शासन निर्णयात घेतलेल्या निर्णयानुसार अगोदर असलेल्या तुटपुंज्या ६००० रूपये मानधनात १००० रुपये वाढ केली. आज महागाईच्या काळात ७००० रूपयाच्या मासिक मानधनात संगणक परिचालकानी स्वतःचा व कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न असताना वारंवार आश्वासन देऊन सुद्धा निर्णय होताना दिसत नाही, मागे नागपुर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान संघटनेच्या वतीने 27 व 28 डिसेंबर रोजी मोर्चा काडून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते, त्याची दखल घेत राज्याचे ग्रामविकासमंत्री मा.ना.गिरीशजी महाजन साहेबानी लेखी आश्वासन दिले, त्यानुसार ११ जानेवारी २०२३ रोजी मा.ग्रामविकासमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संघटनेच्या मागणीनुसार शासनाने नेमलेल्या यावलकर समितीच्या शिफारशीनुसार संगणक परिचालकांना सुधारित आकृतीबंधात ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला व सदरची फाईल वित्त विभागास पाठवण्याचा निर्णय बैठकीत झाला, सध्या ग्रामविकास विभागाने वित्त विभागास सुधारित आकृतीबंधाची फाईल पाठवली आहे, परंतु त्यावर निर्णय होऊन निधीची तरतूद शासनाने अर्थसंकल्पातून करावी या प्रमुख मागणीसाठी २७ फेब्रुवारी २०२३ पासून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालकांना असलेली सर्व कामे बंद ठेऊन बेमुदत संप करण्यात येणार असून ०१ मार्च २०२३ रोजी राज्यातील संगणक परिचालक हजारोंच्या संख्येने मुंबई येथील धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली.

    मुख्यमंत्री ना.शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री ना.फडणवीस साहेबांना आश्वासनाची आठवण करून देणार !

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब हे २०१८ मध्ये युती शासनात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असताना त्यांनी आझाद मैदान, मुंबई येथे संघटनेच्या आंदोलनाला भेट देउन प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला होता, परंतु अद्याप त्यांनी संगणक परिचालकांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे तसेच सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा अनेक वेळा विधानसभा सभागृहात व संघटने सोबतच्या बैठकीत संगणक परिचालकांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते, आता त्यांच्याकडे असलेल्या अर्थ विभागाकडेच संगणक परिचालकांच्या सुधारित आकृतीबंधानुसार पदनिर्मिती व किमान वेतनाची फाईल ग्रामविकास विभागाने पाठवली आहे. या आझाद मैदानावरील आंदोलनाच्या माध्यमातून या दोन्ही मान्यवरांना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देऊन प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे अमळनेर तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नशिराबाद नगरपालिकेचा निकाल जाहीर; नगराध्यक्षपदी योगेश पाटील !

    December 21, 2025

    मोठी बातमी : मतमोजणीला सुरुवात, भाजप पुढे; महायुती 150 जागांवर आघाडीवर !

    December 21, 2025

    भरधाव वाहनाच्या धडकेत कपडे विक्रीसाठी जाताना व्यावसायिक ठार !

    December 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.