देशातील युवक मोठ्या प्रमाणात बेरोजगारीकडे जात असतांना त्या युवकांनी व्यवसाय सुरू करायचा असेल, तर केंद्र सरकारची एक खास योजना आहे. ज्याअंतर्गत लोकांना कोणतीही हमी किंवा तारण न ठेवता 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. प्रधानमंत्री मुद्रा योजना असं या योजनेचं नाव आहे. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना खूप उपयुक्त ठरू शकते. तरुणांना स्वावलंबी बनवण्याच्या आणि छोट्या व्यावसायिकांना बळकट करण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली होती. महत्त्वाचं म्हणजे या योजनेंतर्गत नॉन-कॉरपोरेट आणि बिगर कृषी कारणांसाठी कर्ज दिले जाते. चला तर मग जाणून घेऊया या योजनेचे फायदे आणि अर्ज करण्याची प्रोसेस
या योजनेसाठी, तुम्ही कोणत्याही सरकारी-खाजगी बँकांमध्ये तसेच प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँका, गैर-वित्तीय कंपन्यांमध्ये कर्जासाठी अर्ज करू शकता. कॅटेगिरीच्या हिशोबाने लोन रकमेची लिमिट बनवण्यात आली आहे. यात 3 कॅटेगिरी आहेत. प्रथम- शिशु लोन, यामध्ये 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत उपलब्ध आहे. दुसरे- किशोर लोन, यामध्ये 5 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे आणि तिसरे तरुण लोन आहे, या कर्जामध्ये 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते.
हे लोन तारणमुक्त आहे. तसेच, यासाठी कोणतेही प्रोसेसिंग फीस भरावी लागत नाही. -तुम्ही 1 वर्षापासून 5 वर्षांपर्यंत कर्जाची परतफेड करू शकता. परंतु जर तुम्ही 5 वर्षात परतफेड करू शकत नसाल तर त्याचा कालावधी 5 वर्षांनी वाढवला जाऊ शकतो. -कर्जाच्या रकमेवर कोणतेही व्याज आकारले जात नाही. तुम्ही मुद्रा कार्डद्वारे काढलेल्या आणि खर्च केलेल्या रकमेवरच व्याज आकारले जाते -तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असलात तरीही तुम्ही मुद्रा योजनेद्वारे कर्ज घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला तीन श्रेणींमध्ये कर्ज मिळते. -व्याजदर श्रेणीनुसार बदलतात
कसा करावा अर्ज?
-सर्वात आधी mudra.org.in वर जा. -तीनही कॅटेगिरी होम पेजवर दिसतील, तुमच्या हिशोबाने कॅटेगिरी निवडा. -नवीन पेज उघडेल. अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा. -आधार कार्ड, पॅन कार्ड, कायमस्वरूपी आणि व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा, इन्कम टॅक्स रिटर्नची कॉपी आणि पासपोर्ट आकाराचा फोटो द्या. -जवळच्या बँकेत अर्ज सबमिट करा. बँक अर्जाची पडताळणी करेल आणि कर्ज 1 महिन्याच्या आत उपलब्ध होईल. -ऑनलाइन अर्ज करण्यासाठी युजर नेम आणि पासवर्ड तयार करावा लागेल. त्याच्या मदतीने मुद्रा लोन वेबसाइटवर लॉगिन करा.