भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. भारतामध्ये गावाची अर्थव्यवस्था शहरापेक्षा खूप वेगळी आहे. ग्रामीण भागात लोक उदरनिर्वाह करण्यासाठी शेती, पशुपालन यासारख्या कामांना प्राधान्य देतात. त्यासोबत देशातील शेतकरी शेती सोबत वेगवेगळे जोड व्यवसाय करीत असल्याने अधिक उत्पन्न शेतकरी घेत आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार देखील त्यांना सातत्याने मदत करत असते. सरकार अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करत असते. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिकदृष्ट्या मदत मिळते.
शेतकऱ्यांना मिळेल लाभ
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेमध्ये सामील होणाऱ्या लाभार्थ्यांना प्रतिदिन पन्नास रुपये गुंतवावे लागतात. शेतकऱ्यांना ही रक्कम दररोज भरायची नसून महिन्याला 1,500 रुपये एकरकमी जमा करावी लागते. त्यानंतर एका ठराविक कालावधीनंतर शेतकऱ्यांना 35 लाख रुपये परत मिळू शकतात. या योजनेत (Gram Suraksha Yojana) 19 ते 35 वर्ष वयोगटातील भारतीय नागरिक अर्ज करू शकतात. या योजनेमध्ये 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची सुविधा दिली जाते. ही रक्कम दर महिना, तीन महिने, सहा महिने किंवा दरवर्षी गुंतवली जाऊ शकते. यामध्ये लाभार्थ्याला 1500 रुपये प्रति महा गुंतवावे लागतात, त्यानंतर लाभार्थ्यांना परतावा 31 लाखावरून 35 लाखापर्यंत मिळू शकतो. पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत (Gram Suraksha Yojana) गुंतवणूक करणाऱ्या लाभार्थ्याला पॉलिसीची संपूर्ण रक्कम 80 वर्षे वय पूर्ण झाल्यावर मिळेल. लाभार्थ्याला 35 लाख रुपये रक्कम दिली जाते. या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही भारतीय पोस्टाच्या या https://www.indiapost.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकतात.