• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दहिवद येथे अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण !

आ.अनिल पाटील यांची होती उपस्थिती

editor desk by editor desk
February 13, 2023
in अमळनेर, सामाजिक
0
दहिवद येथे अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण !

अमळनेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील पातोंडा येथून जवळच असलेल्या दहिवद येथे चौक  शुशोभीकरणांतर्गत आमदार निधीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक बांधण्यात आले त्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आमदार अनिल दादा पाटील यांच्या हस्ते झाला.  दहिवद येथील ग्रामपंचायत चौकात मोक्याच्या ठिकाणी स्मारक निर्माण झाल्यामुळे गावातील  धनगर बांधवांनी प्रवेश द्वारा जवळच आमदार अनिल दादा पाटील यांना पिवळा फेटा, घोंगडी व काठी देऊन सवाद्य मिरवणूक करण्यात आली. मिरवणुकीच्या सुरुवातीला गावातील तरुणींनी पिवळा पोशाख परिधान करून हातात महादेवाची पिंड घेऊन आमदारांना असंख्य ग्रामस्थ महिला भगिनी यांच्या उपस्थितीत सभामंडपात आणले.

त्यावेळी दीपप्रजलानाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोक तुळशीराम पाटील होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण भूमिपुत्र आमदार अनिल दादा पाटील यांच्या हस्ते तर डी ए धनगर, बन्सिलाल भागवत व असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे राज्यकारभाराचे उत्तम उदाहरण आहे. तसेच त्यांनी अनेक समाज उपयोगी कार्य केले. त्यांनी अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केला. असा गौरवोगार उद्घाटक अनिल दादा पाटील यांनी केला. यावेळी मौर्य क्रांती संघाचे बन्सिलाल भागवत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की अहिल्यादेवी होळकरांनी सती प्रथा बंद केली. डी ए धनगर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की गावागावातील पायविहिरी आजही अहिल्यादेवींच्या कार्याची साक्ष देत आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक तुळशीराम पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी खास धनगरी वेश परिधान केलेले आधार लांडगे व गुलाब धनगर, गोपीचंद शिरसाठ, रमेश देव शिरसाठ, चेतन देवरे, गावातील ग्रामपंचायत सदस्य, वि.का.सो. सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामकृष्ण धनगर, खंडू धनगर, संभाजी धनगर, अशोक धनगर वासुदेव धनगर, रमेश धनगर, ज्ञानेश्वर धनगर, सुनील धनगर, संतोष धनगर, बाळासाहेब धनगर, रावसाहेब धनगर, गणेश धनगर, रामकृष्ण धनगर सतीश धनगर, भालचंद्र धनगर, हरि धनगर, बापू धनगर, किरण धनगर, दत्तू धनगर, गणेश धनगर, सुरेश धनगर, विलास धनगर, संतोष धनगर, हेमंत धनगर, धिरज धनगर, सुहास धनगर, गौरव धनगर, प्रितम धनगर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर खंडू राघो धनगर यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.

Previous Post

अवैध वाळू डंपरसह तीन संशयिताना पोलिसांनी घेतले ताब्यात !

Next Post

शेती करणाऱ्याना या योजनेतून मिळणार मोठी मदत !

Next Post
शेती करणाऱ्याना या योजनेतून मिळणार मोठी मदत !

शेती करणाऱ्याना या योजनेतून मिळणार मोठी मदत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group