• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सासऱ्यांनी पाठविले सुनेला आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर !

editor desk by editor desk
February 10, 2023
in अमळनेर, जळगाव, सामाजिक
0
सासऱ्यांनी पाठविले सुनेला आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर !

अमळनेर : प्रतिनिधी 

अमळनेरातील गोकलानी कुटुंबीयांनी लग्नासाठी त्यांच्या होणाऱ्या सुनेला अहमदनगर येथून चक्क हेलिकॉप्टरने अमळनेरात आणले आहे. या गोष्टीची संपूर्ण राज्यात चांगलीच चर्चा रंगली असल्याचं पाहायला मिळत आहे. अमळनेर येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सरजू गोकलानी यांच्या एकुलत्या एक मुलाचा आशिष यांचा विवाह अहमदनगर येथील प्रसिद्ध उद्योजक संजय चंदानी यांची मुलगी सिमरन हिच्याशी आज शुक्रवार, १० फेब्रुवारी रोजी अमळनेर शहरात पार पडत आहे.

आशिष हा इंजिनियर आहे तर सिमरन चंदानी ही सुद्धा उच्चशिक्षित मुलांच्या शिक्षण पद्धतीवर आधारित असलेल्या एका प्रसिद्ध कंपनीच्या एज्युकेशन ॲपमध्ये संचालक पदावर कार्यरत आहेत. एकुलता एक मुलगा असल्याने विवाह शाही थाटात व्हावा होणाऱ्या सुनबाईला तिच्या गावावरून हेलिकॉप्टरने लग्नाच्या ठिकाणी आणणार असं स्वप्न सरजू गोकलानी यांनी बघितलं होतं. त्यानुसार त्यांनी सुनबाईला तसेच तिच्या कुटुंबियांना न कळवता गुरुवारी थेट सुनबाईला लग्नाच्या ठिकाणी अमळनेर येथे आणण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. हेलिकॉप्टर पाठवून आशिषने व त्याच्या वडिलांनी नवरी मुलगी सिमरन व तिच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का दिला. अहमदनगर येथून चक्क हेलिकॉप्टर मध्ये बसून नवरी मुलगी सिमरन व तिच्या कुटुंबियांचे अंमळनेर आगमन झाले. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरले त्या ठिकाणी सिमरनच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. यानंतर दोघेही जोडपे सुरुवातीला अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरावर दर्शनासाठी गेले या ठिकाणी त्यांनी हेलिकॉप्टर मधून मंदिरावर पुष्पृष्टी करत सर्वांचेच लक्ष वेधले. सिमरन हिला सूनबाई समजून नव्हे तर मुलगी समजून तिचा स्वीकार करत असल्याचे सरजु गोकलानी हे बोलताना सांगतात.

हेलिकॉप्टर आल्याने सिमरन हिचा सुद्धा आनंद गगनात मावत नव्हता. तिला आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता. आपलं लग्न हे अनोख्या पद्धतीने व्हावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं मात्र चक्क हेलिकॉप्टरमधून लग्नाच्या ठिकाणी पोहचणे हे माझ्यासाठी एक स्वप्नच आहे, या गोष्टीचीच काय पण हेलिकॉप्टर मधून प्रवासाची मी कधी कल्पना सुद्धा केली नव्हती. यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते या शब्दात सिमरन हिने तिच्या भावना व्यक्त केल्या. हा विवाह सोहळा आज पार पडत असला तरी विवाहापूर्वी वधू मुलगी ही लग्नाच्या ठिकाणी हेलिकॉप्टर मधून आल्याने या विवाह सोहळ्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Previous Post

जळगावात चारचाकी जळून खाक !

Next Post

महोत्सवाचा निर्भेळ आनंद घ्या – नाट्य- सिने कलावंत ओंकार भोजने !

Next Post
महोत्सवाचा निर्भेळ आनंद घ्या  – नाट्य- सिने कलावंत ओंकार भोजने !

महोत्सवाचा निर्भेळ आनंद घ्या - नाट्य- सिने कलावंत ओंकार भोजने !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील आक्रमक : आता सरकारला संधी द्यायची नाही !
राजकारण

मनोज जरांगे पाटील आक्रमक : आता सरकारला संधी द्यायची नाही !

July 12, 2025
ते विधेयक जनतेच्या नव्हे, तर भाजपच्या सुरक्षेसाठी ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !
राजकारण

ते विधेयक जनतेच्या नव्हे, तर भाजपच्या सुरक्षेसाठी ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !

July 12, 2025
सात वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य ; गुन्हा दाखल !
क्राईम

अल्पवयीन मुलाचे अश्लील व्हिडीओ काढले : दोघांवर गुन्हा दाखल !

July 12, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून ६०  हजारांचा मुद्देमाल लंपास !

July 12, 2025
१५ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत दुर्देवी मृत्यू !
क्राईम

१५ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत दुर्देवी मृत्यू !

July 12, 2025
मोठी बातमी : माजी मंत्री देवकर आप्पांच्या अडचणी वाढणार ; चौकशी अहवालात दोषी !
क्राईम

मोठी बातमी : माजी मंत्री देवकर आप्पांच्या अडचणी वाढणार ; चौकशी अहवालात दोषी !

July 12, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group