Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पालकमंत्र्यांच्या दरबारी…जळगाव मनपाचा तिढा सुटणार ?
    जळगाव

    पालकमंत्र्यांच्या दरबारी…जळगाव मनपाचा तिढा सुटणार ?

    editor deskBy editor deskFebruary 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    ‘अमृत२.०’ योजनेचा प्रकल्प सादर न करू शकल्याने शासनाने योजनते वगळल्याचे पत्र दिले होते. या योजनेचा प्रकल्प अहवालासाठी एजन्सी नियुक्तीच्या प्रस्तावावर हा विषय रेंगाळलेला आहे. याबाबत आता पालकमंत्री तथा पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे लवकरच बैठक होणार असून यात एजन्सी नियुक्तीबाबतचा मार्ग काढला जाणार आहे.

    अमृत २.० योजना जळगाव शहरासाठी मंजूर करण्यात आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून १२०० कोटी रूपयांची तरतूदही आहे. त्यासाठी मनपाने प्रकल्प अहवाल एका एंजन्सी मार्फत तयार करून शासनाला पाठवायाचा आहे. एजन्सीची नावेही शासनाने दिली आहेत, त्यातील एकाला हे काम द्यावयाचे आहे. परंतू एजन्सी कोणाला नेमायची यावरून च सत्ताधारी, विरोधक तसेच मनपा प्रशासनात एकमत न झाल्याने महापालिकेडून एजन्सी नियुक्तीचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अमृत २.० योजनेच्या विकास आराखडा तयार करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ला काम द्यायचे की दुसर्‍या एजन्सीला नेमावे यासाठी आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी दखल घेत पालकमंत्री यांच्याकडे लवकरच याबाबत बैठक होणार आहे.

    लवकरच अधिकार्‍यांसोबत होणार बैठक
    अमृत २.० योजनेच्या प्रकल्प विकास आरखाडा तयार करण्याच्या एजन्सी नेमणूक बाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे लवकरच बैठक होणार आहे. बैठकीस आमदार, मनपाचे पदाधिकारी, अधिकारी यांची मजीप्रा अधिकार्‍यांसोबत संयुक्त बैठक घेवून यावर तोडगा काढला जाणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    मालेगाव मनपाच्या विद्युत विभागात सामूहिक नमाज ;राजकीय वाद पेटणार !

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.