नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील शासकीय अधिकारीसह कर्मचारी लाच घेण्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले असले तरी प्रत्येक जिल्ह्यातील लाच लुचपत विभागात देखील तितकाच कारवाई करण्यात सक्रीय आहे. आरटीओ अधिकाऱ्यांची हप्तेवसुली चेक पोस्ट क्रॉस करतांना ही ट्रक चालकांसाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील कांद्री चेक पोस्टवर ट्रक चालकाकडून लाच स्वीकारतांना परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले.
नागपूर ग्रामीण परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक अभिजत मांजरे हे आपल्या साथीदाराच्या मदतीने खाजगी ट्रक चालकाकडून चेक पोस्ट पास करण्यासाठी लाच घेतात. पैसे न दिल्यास ट्रक चेक पोस्टवरून सोडत नसल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे आली होती.
ट्रक चालकांनी कंटाळून लाचलुचपत विभागाने याची तक्रार केली. या तक्रारीनुसार बुधवारी (८ फेब्रुवारी) रात्री उशिरा लाचलुचपत विभागाने सापळा रचला. या दरम्यान चेक पोस्ट क्रॉस करण्यासाठी एका ट्रक चालकडून पाचशे रुपयाची लाच स्वीकारतांना अभिजित मांजरे, करण काकडे व विनोद लांजेवार यांना अटक केली. या घटनेनंतर वाहन निरीक्षक अभिजित मांजरे यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी करणार असल्याची माहिती पुढे येत आहे.