आजपासून जगभर व्हॅलेंटाईन वीकला सुरूवात होत आहे आणि १४ फेब्रुवारीपर्यंत चालतो. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात रोझ डे ने होते. या दिवशी लोकं आपल्या प्रियकर प्रियसीला रोझ देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. असंख्य जोडपी वर्षभर व्हॅलेंटाईन वीकची वाट पाहत असतात. रोझ डे दरवर्षी ७ फेब्रुवारीला साजरा केला जातो.
रोझ डेच्या काही दिवस आधी बाजारात लाल, पिवळा, गुलाबी, पांढरा असे अनेक रंगाचे गुलाब बाजारात उपलब्ध होत आहेत. रोझ डे हा तुमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी खूप चांगला दिवस मानला जातो. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला रोझ डे का साजरा केला जातो आणि त्याचा नेमका इतिहास काय आहे याची सविस्तर माहिती सांगणार आहोत.
गुलाबाचं प्रेमसंबंधाशी खूप जून नातं आहे. ग्रीक आणि रोमन सभ्यतेत गुलाबाला प्रेमाची देवी एफ्रोडिटी आणि वीनसबरोबर जोडलं गेलं आहे. देवांचं जेवण अमृत होतं. प्रेमाचे देवता क्यूपिड जेव्हा त्यांची आई देवी वीनससाठी अमृत घेऊन आले तेव्हा त्यांनी त्या अमृताचे काही थेंब त्या जागेवर शिंपडले. त्याच जागी पहिलं गुलाब उगवलं, अशी कथा सांगितली जाते. रोझ डेच्या दिवशी लोक त्यांचे प्रेम त्यांच्या आवडीच्या व्यक्तीसमोर व्यक्त करतात. काही लोकं वर्षभर मनामध्ये साठवून ठेवलेले प्रेम यादिवशी गुलाबाचे फुल देऊन आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करतात. हा दिवस प्रेमीयुगुलांच्या आयुष्यात महत्वाचा मानला जातो.
काय आहे इतिहास
गुलाबाचे फूल हे आपल्या भावना व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की, मुघल बेगम नूरजहाँला लाल गुलाब खूप आवडत होते. असे म्हणतात की, नूरजहाँचे मन प्रसन्न करण्यासाठी तिचा नवरा रोज ताजे गुलाब तिच्या वाड्यात पाठवत असे. दुसर्या कथेनुसार, राणी व्हिक्टोरियाच्या काळात, लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबांची देवाणघेवाण करण्याची परंपरा सुरू केली. असे मानले जाते की, व्हिक्टोरियन आणि रोमन देखील गुलाबाने त्यांचे प्रेम व्यक्त करायचे.