धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील खळ्यातील गोडावून चोरट्यांनी फोडून हजारोचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, धरणगाव तालुक्यातील बोरगाव गावात गजानन रविद्र चव्हाण यांच्या मालकीचे खळ्यात गोडावून आहे. या गोडावूनमध्ये टॅक्टर बटरी व टॅक्टरचे साहित्य वेडिंग मशीन यासह त्यांच्या उपयोगातील मशीन होती. दि ५ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री १२ वाजेनंतर अनोळखी चोरट्यांनी तब्बल ७० हजाराचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.जितेंद्र भदाणे हे करीत आहेत.