धरणगाव : प्रतिनिधी
शहरात अखंड हरीनाम सप्ताह ह.भ.प.गजानन महाराज वरसाळेकर यांच्या काल्याच्या कीर्तन मोठ्या उत्साहात सुरु असतांना आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली.
शहरातील अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आज काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, गटनेते पप्पू भावे, भानुदास विसावे, विजय महाजन, शहरप्रमुख विलास महाजन, पवन महाजन, वाल्मिक पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी सप्ताहात एकच भक्तीमय वातावरण तयार झालेले असतांना मंत्री पाटील यांनी यंदाच्या सप्ताहासाठी ५१ हजार रुपये दिले तर पुढील वर्षासाठी २ लाख ५१ हजार रुपये देणार असल्याची घोषणा यावेळी मंत्री पाटील यांनी केली आहे.