जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील एका तरुणाने तू माझ्याशी लग्न कर म्हणत २३ वर्षीय महिलेचा हात धरून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार तालुक्यातील एका गावात नोव्हेंबर महिन्यात घडला असून शुक्रवारी महिलेच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, २३ वर्षीय विवाहिता ही जळगाव तालुक्यातील एका गावात कुटुंबासह वास्तव्यास आहे. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता विवाहिता घरासमोर उभी होती. अचानक त्या ठिकाणी एक तरुण दुचाकीवरून आला. तू माझ्याशी लग्न कर, असे बोलून त्याने विवाहितेचा हात धरून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर विवाहितेच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली. याबाबत तीन महिन्यांनंतर विवाहितेने तालुका पोलिसात तक्रार दिली.